Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

ब्रेल लिपितील ५ पुस्तकांचे प्रकाशन

अंध विद्यार्थिनींनी केले कविता वाचन

marathinews24.com

पुणे – शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतूने दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीने बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्ष सुरू केला आहे.

महिला आयोगाच्या कामाला सरकारचे पाठबळ – सविस्तर बातमी

या वाचन कक्षात डॉ. संगीता बर्वे यांच्या ‌‘चला चला रे चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञानापुढती सारे आपण होऊ या नतमस्तक‌’ कवितेचे खणखणीत उच्चारात वाचन केले ते दि पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड येथील विद्यार्थिनींनी अन्‌‍ त्यांच्या पाठोपाठ या कवितेच्या ओळी उधृत केल्या त्या अत्रे प्रशालेतील विद्यार्थिनींनी अनोख्या उपक्रमाचे निमित्त ठरले ते डॉ. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‌‘खारुताई आणि सावलीताई‌’, ‌‘रानफुले‌’, ‌‘झाड आजोबा‌’, ‌‘हुर्रे हुप्‌‍‌’ आणि ‌‘पियूची वही‌’ या पुस्तकांच्या सरोज टोळे यांनी ब्रेल लिपित केलेल्या रुपांतरच्या प्रकाशन समारंभाचे. या पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले ते अंध व्यक्तीही पाहू शकतील अशी चित्रे रेखाटणारे प्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत. हा समारंभ मंगळवारी (दि. ९) बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षात आयोजित करण्यात आला होता.

चिंतामणी हसबनीस, डॉ. संगीता बर्वे, सरोज टोळे, अत्रे प्रशाला इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापीका चंचल लालवाणी, संदर्भतज्ज्ञ, अत्रे प्रशालेतील ग्रंथपाल प्रसाद भडसावळे तसेच निकिता रोकडे, ईश्वरी बेर्डे, हिंदवी माळी, युतिका जाधव, त्रियांशी सांकला, चिराग देव या अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि प्रशालेतील विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अंध शाळेच्या उज्ज्वला सोनी, अर्चना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थिनींशी संवाद साधताना डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, केवळ दृष्टी असून उपयोग नाही तर समाजातील चांगल्या गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी डोळस असावे लागते. वाचनाची आवड जोपासत समाजहिताचे कार्य करण्याचा वसा आवर्जून घ्या.

सरोज टोळे म्हणाल्या, अंध व्यक्तींनाही पुस्तकांचा स्पर्श हवा असतो. ब्रेल लिपित पुस्तके केल्यामुळे अंध व्यक्ती ती पुस्तके वाचू शकत आहे याचे मला खऱ्या अर्थाने समाधान आहे. एका तरी अंध व्यक्तीला मित्र करा, कारण त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे बरेच काही असते, असे सांगून चिंतामणी हसबनीस म्हणाले, वाचन संस्कृती जपण्याचे काम केवळ डोळस व्यक्तीच करतात असे नाही तर अंध व्यक्तीही करीत असतात. अंध व्यक्तींनी वाचनाची आवड कायम जोपासावी; कारण तो दिवस दूर नाही. अंध व्यक्ती डोळस व्यक्तीला पुस्तक वाचून दाखवेल.

प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती प्रसाद भडसावळे यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×