Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune ACB Bribery Case : फेरफार नोंदींसाठी २० हजारांची लाच मागितली

Pune ACB Bribery Case

मंडल अधिकारी महिलेला घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – Pune ACB Bribery Case : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नावाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी घोटावडे येथील महिला मंडल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७, मंडल अधिकारी, घोटावडे, रा. सदाशिव पेठ) असे त्यांचे नाव आहे. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान त्यांनी स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याबाबत ४० वर्षीय नागरिकाने २४ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पर्शियन मांजरीची चोरी करून विक्री; ५ जणांवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

तक्रारदार यांनी मोजे केमसेवाडी येथे १२ आर क्षेत्र खरेदी केले होते. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीवर नोंद केल्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी गुप्ते यांनी तक्रारदाराला मोबाइलवरून संपर्क केला होता. या कामासाठी स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी दोन नोंदींचे पाच-पाच हजार रुपये, असे एकूण २० हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती. (Pune ACB Bribery Case) तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ जुलै रोजी पडताळणी केली. त्या वेळी पंचांसमक्ष गुप्ते यांनी स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी पौड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सातनुसार गुन्हा दाखल केला.

गुप्ते यांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, सूर्यास्त झाल्याने न्यायालयाच्या परवानगीने अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलिस निरीक्षक अशोक गवारी यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×