Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune : मध्यभागातील वाहतुकीत उद्या बदल

Pune Traffic Changes : पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतूक बदल

शहरातील सर्व शाळा दुपारी बारापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश

marathinews24.com

पुणे – ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (२३ जानेवारी) होणार आहे. शेवटच्या टप्यात शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ‘पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी, तसेच खासगी शाळा शुक्रवारी दुपारी बारापर्यंत सुरु ठेवाव्यात. त्यानंतर शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत’ असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
या स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात शुक्रवारी ९९ किलोमीटर मार्गावर ही शर्यत होणार आहे.

आईने खेळायला जाऊ न दिल्यामुळे विद्यार्थ्यांने घेतला आत्महत्या – सविस्तर बातमी 

बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथून स्पर्धोचा प्रारंभ होणार आहे. तेथून पाषाणमार्गे एनसीएल चौक, रक्षक चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल, भक्ती शक्ती चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, काळेवाडी फाटा, आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) सेनापती बापट रस्ता, बालभारती, नळस्टाॅप, लक्ष्मीनारायण चौक, शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), लष्कर परिसर टर्फ क्लब, साधू वासवानी चौक, साखर संकुल हा मार्ग स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

बालेवाडीतील राधा चौक ते सुस खिंड रोड , पूनम बेकरी ते पाषाण चौक, पाषाण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राजीव गांधी पूल, सेनापती बापट रस्ता, पत्रकार भवन ते विधी महाविद्यालय रस्ता, नळस्टॉप ते सेनादत्त पेठ, टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक, दगडूशेठ हलवाई ते मंडई, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील राष्ट्रभूषण चौक ते ना. सी. फडके चौक, नरपतगिरी चौक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, लष्कर भागातील अर्जुन चौक ते घोरपडी परिसर, लाल महाल चौक ते स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), गरवारे चौक ते जंगली महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

‘सायकल स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी दुपारी बारा ते चार दरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धेचा मार्ग टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहे. कोणताही रस्ता अर्ध्या तासांहून जास्त वेळ बंद ठेवण्यात येणार नाही. स्पर्धेच्या मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेच्या काळात शहरात जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा.रुग्णवाहिकांना त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. स्पर्धा मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले जातील’, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. परदेशातील सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नागरिकांनी स्पर्धेकांना उस्फूर्त प्रतिसाद दिला आहेे.

– रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×