Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

पुण्यात न्यायालयाने आरोपींना दिली अनोखी शिक्षा

पुण्यात न्यायालयाने आरोपींना दिली अनोखी शिक्षा

४ दिवस करावी लागणार झाडलोट

marathinews24.com

पुणे – नशा केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्‍या दोघांना पुणे न्यायालयाने दणका दिला असून, ४ दिवस रोज ३ तास सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्याची (कम्युनिटी सर्व्हिस) शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलिसांच्या देखरेखीखाली ही सेवा करावी लागणार आहे. असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगणार साहसी एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा – सविस्तर बातमी 

विनोद वसंत माकोडे (वय ३२, रा. सांगवी खुर्द, अकोला), सागर रामकृष्ण बोदाडे (वय ३६, रा. सांगवी खुर्द, अकोला) अशी शिक्षा ठोठावल्यांची नावे आहेत. २ डिसेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अंमलदार मखरे आणि तायडे हे गस्त घालत होते. त्यावेळी पुणे महानगरपालिका इमारतीच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी आरोपी माकोडे, बोदाडे हे दोघेजण नशा करून गैरवर्तन करत असताना मिळून आले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना सार्वजनिक ठिकाणी साफ सफाईची शिक्षा सुनावली. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४-क अन्वये ही शिक्षा सुनावण्यात आली. यासाठी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे अंमलदार सुधीर घोटकुले, मखरे, तायडे, कार्ट अंमलदार कांबळे यांनी कामकाज पाहिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×