Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime : रविवार पेठेत घरफोडी; दोन लाखांचा ऐवज चोरीला

Pune House Burglary News

बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले

marathinews24.com

पुणे – Pune Crime : भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना रविवार पेठेतील जुनी गुजरी परिसरात घडली. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या घरात शिरलेल्या चोरट्याने कपाट उचकटून दोन लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर चोरट्यांकडून डाॅक्टर महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचे कुटुंबीय रविवार पेठेतील जुनी गुजरी परिसरात असलेल्या केएनजी काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास तक्रारदाराची पत्नी खरेदीसाठी बाहेर पडली. Pune Crime : चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने दोन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

स्वारगेट पीएमपी थांब्याजवळ तिकिटांची पिशवी चोरीला

स्वारगेट पीएमपी थांबा परिसरात तिकिटांची पिशवी (ट्रे) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. चोरलेल्या तिकिटांची किंमत २६ हजार ७४० रुपये आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपी वाहक प्रल्हाद ढाकणे (वय ४४) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पीएमपी थांबा परिसरात तिकिटांची पिशवी शनिवारी (१० ऑक्टोबर) दुपारी चोरीला गेली. तिकिटांची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ढाकणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×