Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Diwali Theft News : पुण्यात लक्ष्मीपूजनानिमित्त चोरट्यांचा उच्छाद

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

देवघरातून ६४ लाखांचा ऐवज लंपास

marathinews24.com

पुणे – लक्ष्मीपूजनानिमित्त चोरट्यांनी उच्छाद मांडला. शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड असा ६४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. हडपसर, कात्रज, हडपसरमधील महंमदवाडी, लोणीकंद परिसरातील अष्टापूर, तसेच बिबवेवाडी भागताील सुखसागरनगर भागात या घटना घडल्या.

कौटुंबिक वादातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

लक्ष्मीपूजनानिमित्त देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड असा ४७ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा हडपसर भागातील अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोरील सोसायटीत बंगला आहे. रविवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी लक्ष्मीपूजनानिमित्त त्यांनी देवघरात सोन्याचे दागिने आणि १२ लाखांची रोकड ठेवली होती. पूजनासाठी लक्ष्मीहार, गंठण, माळ, कर्णफुले, अंगठी असा ऐवज ठेवला होता. पूजा केल्यानंतर त्यांनी ऐवज देवघरात ठेवला. रात्री तक्रारदार आणि त्याचे कुटुंबीय झोपले. मध्यरात्री बंगल्यात चोरटे शिरले. तळमजल्यावरील खोलीत देवघर आहे. काच सरकवून चोरटे खोलीत शिरले. चोरट्यांनी पूजेत मांडलेले दागिने, १२ लाखांची रोकड चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे तपास करत आहेत.

कात्रजमधील संतोषनगर भागातील एका सोसायटीतील घरातून चोरट्यांनी एक लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय हे कात्रजमधील संतोषननगर भागात असलेल्या हनुमान काॅम्प्लेक्स इमारतीत राहायला आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (८ नोव्हेंबर) त्यांनी देवघरात पूजेसाठी दहा हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एक लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज ठेवला होता. सोमवारी (९ नोव्हेंबर) सकाळी सदनिकेचा दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. देवघरात ठेवलेले दागिने आणि रोकड लांबवून चोरटा पसार झाला. बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात लक्ष्मीपुजनाच्या दिवशी देवघरात ठेवलेले साेन्याचे दागिने, रोकड असा तीन लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील अष्टापूर गावातील बंगल्यात लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ५० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने, दुचाकी, मोटारीची चावी असा दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे तपास करत आहेत. कोंढव्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त देवघरात ठेवलेले एक लाख ८२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक रमेश शेलार तपास करत आहेत.

हडपसर भागातील काळेपडळ परिसरात देवघरात ठेवलेले एक लाख ८२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी प्रवीण काळभोर तपास करत आहेत. काळपेडळ भागातील महंमदवाडी रस्त्यावरील एका घरात लक्ष्मीपूजनानिमित्त देवघरात ठेवलेले सात लाख ३४ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×