Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा टप्पा क्रमांक एक

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६; पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेश

वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने “पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित टप्पा क्रमांक एकच्यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासोबत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहे.

राष्ट्रीय वीरगाथा ५.० स्पर्धेत महाराष्ट्रातील १९ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड – सविस्तर बातमी

या स्पर्धेचा टप्पा क्रमांक एक अंतर्गत पौड, लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव पोलीस स्टेशनहद्दीत एकूण ५३.८ कि.मी अंतर असून स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

पौड पोलीस स्टेशन हद्दीत : पर्यायी रस्ता नसल्याने राज्य महामार्ग क्र. १३० वरील घोटावडे गाव बापुजीबुवा मंदिर ते अंबडवेट कमान, एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. ११० वरील अंबडवेट कमान ते पौड करमोळी चौक तसेच एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. २६ वरील पौड करमोळी चौक ते काशिंग जवण चौक दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद करण्यात येत आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत : मौजे चावसर, जवन क्र. २, ३ आदी गावाकडून येणारी वाहने मुंबई व पुणे बाजुकडे जाण्याकरिता जवन क्र. १ येथे न येता जवन क्र. २ व ३ चावसर आदी गावातील वाहने ही मौजे तुंगी फाटा मार्गे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.

मौजे आवेगाव, शिंदगाव आदी गावाकडून येणारी वाहने ही कार्ले फाटा येथे येण्यास बंद करण्यात येणार असून आंबेगाव, शिंदगाव आदी गावातील वाहने ही दुधिवरे मार्गे औंढे औंढोली पुढे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.

कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत : कडधेगांव हे हिंजवडी, पवनानगर, पौडकडे जाणारे मुख्य जंक्शन असल्याने कामशेत ते पवनानगर पौड अशी जाणारी वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे.

कामशेत कि.मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक कामशेत ते पवनानगर, पौड अशी पवनानगर मार्गाकडे जाणारी वाहतूक स्पर्धेच्या दिवशी जुने पुणे-मुंबई हायवे (एनएच ४८) कामशेत कि. मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पवनानगर, पौड, आर्डव, शिंवणे, महागांव, शिरगांवकडे जाणारा कामशेतकडून एकचमार्ग असून पर्यायी मार्ग नसल्याने कामशेत ते पवनानगर, पौडकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.

मवडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत : शिरगाव परंदवडीकडून येणारी वाहतूक बेबडओहोळ मार्गे शिवणे शिवली बाजुकडे न पाठवता जुने मुंबई-पुणे हायवेने वळविण्यात येणार आहे. चांदखेडकडून डोणेकडे येणारी वाहतूक चांदखेड दरम्यान तसेच कामशेतमार्गे थुगांवकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मौजे कामशेत येथे स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे.

मळवंडी ढोरे, येळघोल शिवली गावाकडून आर्डव बाजुकडे येणारी वाहतूक भडवली गावाच्या अलीकडील चौकात येलघोल फाटा येथे सायकल स्पर्धा पूर्ण होईपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×