Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

पुण्यातील पत्रकारांनी केले नको ते कृत्य; भोंदू खरातशी कनेक्शन, २५ लाखांची घेतली सुपारी

अ‍ॅड. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या आरोपामुळे खळबळ; नामांकित चौकडींमुळे पत्रकारितेला काळिमा

marathinews24.com

पुणे – रेड लाईट भागातील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ काढून स्टींग ऑपरेशनचे गोंडस नाव देणार्‍या तथाकथित पत्रकार रोहन कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा. तसेच हे स्टींग ऑपरेशन घडवून आणण्यासाठी नामांकित ३ पत्रकारांनी एका राजकीय महिला पदाधिकार्‍याकडून तब्बल २५ लाख रूपयांची सुपारी घेतली. दरम्यान, भोंदू खरातला आम्ही उघडे पाडल्यानंतर आमच्यासोबत बदला घेण्यासाठी डाव रचला गेला. त्यामुळेच याची चौकशी करून पत्रकारांसह त्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अ‍ॅड. रूपाली पाटील ठोंबरे, अ‍ॅड विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत होते.

स्वारगेट परिसरात खुनाचा प्रयत्न, वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत – सविस्तर बातमी

रूपाली पाटील म्हणाल्या, भोंदू खरात प्रकरण उजेडात आणण्यासाठी आम्ही मोठे कष्ट केले. त्या प्रकरणात शून्य झालेला बाईला हाताशी धरून मला बदनाम करण्यासाठी पुण्यातील तीन नामांकित पत्रकारांनी डाव रचला होता. त्यासाठी २५ लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार पत्रकार रोहन कदम हा बुधवार पेठेतील लॉजमध्ये गेला. त्याठिकाणी त्याने महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ शुट केला असता तो पकडला. त्यामुळे त्या महिलेने त्याला बेदम मारले. त्यानंतर महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करून आरोपीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित पत्रकार चौकडीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर दबाव आणला आहे. त्यासाठी विविध ठिकाणाहून फोन केले. मात्र, याप्रकरणी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून, गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे.

सुपारी वाजवण्यासाठी २५ लाख रुपये घेतले

ठोंबरे पाटील कुटूंबियाला बदनाम करण्यासाठी २५ लाखांची रसद मुख्य पत्रकाराला महिलेकडून पुरविण्यात आली. त्यानंतर त्याने प्रत्येकी २ लाख रूपये संबंधित छोट्या पत्रकारांना वाटले. त्यानुसार पत्रकार रोहन कदम याला लॉजमध्ये पाठवण्यात आले. हा लॉज आमच्या नातेवाईकांचा असल्याचे सांगून, त्याद्वारे आम्हाला कटात अडवण्याचा डाव होता. हा डाव उधळून लावण्यात आला आहे. हे पैसे कोणी दिले, आर्थिक रसद पाठवली कोणी, कट कोणी रचला, तीन पत्रकार कोण आहेत यासंदर्भात आम्ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील हेच ते चौघे पत्रकार

राजकीय पदाधिकार्‍यांसह अनेक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना हाताशी धरून हा पुण्यातील चौकडीचा अतिस्मार्ट पत्रकारांचा गट मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अनेक प्रकरणात मध्यस्थी करणे, खंडणी मागणे, पब-हॉटेल लॉजमध्ये फुकटच्या पार्ट्यांवर ताव मारणे, अधिकारी-पदाधिकार्‍यांवर दबाव टाकणे, पोलिसांसह इतरांना हाताशी धरून प्रकरण वाजवण्यात यांचा हातखंडा आहे. आताही भोंदू खरात प्रकरणात निगडीत असलेल्या एका महिला पदाधिकार्‍यांना हाताशी धरून तब्बल २५ लाखांची सुपारी घेणार्‍या चौकडींविरूद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला नाही, तर मी न्यायालयात धाव घेउन न्यायाची मागणी करणार आहे. मात्र, पोलीस यामध्ये बारकाईने लक्ष देतील. आम्हाला न्यायाची प्रतीक्षा आहे.

रूपाली पाटील ठोंबरे, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (अजित पवार गट)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×