Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune Lokmanya Festival : पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल

Pune Lokmanya Festival : पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल

नवरात्रोत्सवात संस्कृती, कला आणि मनोरंजनाचा जल्लोष

marathinews24.com

पुणे – Pune Lokmanya Festival : नवरात्रोत्सवानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’ चे आयोजन लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे करण्यात आले आहे. यंदाचे २९ वे वर्ष असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख समन्वय साधत पुणेकरांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. गणेश सातपुते, निमंत्रक शुभांगी सातपुते आणि उत्सव अध्यक्ष डॉ. नरेश मित्तल हे आहेत.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ ला पुणेकरांचा प्रतिसाद – सविस्तर बातमी 

रविवार (दि. ११) सायंकाळी ५ वाजता भव्य उद्घाटन सोहळा व देवीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून शौर्य ढोल-ताशा पथक हे विशेष आकर्षण असणार आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबरला ‘साई दरबार’, १३ ऑक्टोबरला ‘पाहणं तुम्ही म्हणाल तसं’ लावणी कार्यक्रम, १४ ऑक्टोबरला ‘गीतों का सफर’, तर १५ ऑक्टोबरला लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune Lokmanya Festival) १६ ऑक्टोबरला महाकाली तांडव नृत्य लाईव्ह शो, १७ ऑक्टोबरला महिलांसाठी ‘रास रिदम गरबा नाईट’, १८ ऑक्टोबरला ग्रुप डान्स/सोलो डान्स स्पर्धा आणि १९ ऑक्टोबरला दांडिया कार्यक्रम होणार आहे. २० ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त रावणदहन, तर २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘टेंशन खल्लास’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

विशेष म्हणजे महोत्सवातील सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्यावतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×