Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य – महापौर मंजुषा दीपक नागपुरे 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदान स्मरणार्थ खारघर येथे भव्य आयोजन

marathinews24.com

पुणे – श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर येथे आयोजित हिंददीचादर’ कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी केले.

चंद्रकांतदादा पाटील यांची अशीही संवेदनशीलता – सविस्तर बातमी

शीख समाजाचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांनी ‘मानवता’ आणि ‘धार्मिक स्वातंत्र्य’ या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, तो इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो. “श्रद्धेसाठी स्वतःचे शीश अर्पण करणे” अशी घटना जागतिक इतिहासात विरळच आहे. त्यांच्या याच बलिदानामुळे त्यांना कृतज्ञतेने ‘हिंद दी चादर’ म्हटले जाते.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी २०२६ व ०१ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य तथा कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी, बंजारा समाजाच्या कविता दिलीप राठोड, रमेश चव्हाण,जीतएल चांदवाणी,असांजा तसेच शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकी) या नऊ समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत कार्यक्रमास जाण्याकरिता बसेसची व्यवस्था करण्यात यावी, बसेस सोबत रुग्णवाहिका व प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करावी. पीएमपीएमएलच्या बसेसवर जनजागृती करण्याकरिता कार्यक्रमाचे जाहिरात फलक लावण्यात यावेत आदी सूचना करण्यात आल्या.

महापौर नागपुरे म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेकडून बैठकीत करण्यात आलेल्या केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने तात्काळ पूर्तता करण्यात येईल आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.

उप महापौर वाडेकर म्हणाले, ‘हिंद कि चादर ‘ या परिवारात सर्व माझे मित्र असून त्यांना सदर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरिता योग्य ते सहकार्य करण्यात येईल तसेच या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीकरिता आरोग्यप्रमुख नीना बोराडे, मा. उपायुक्त (परिमंडळ क्र.१), माधव जगताप, उपायुक्त (परिमंडळ क्र.२) श्री संतोष वारुळे, उपायुक्त (परिमंडळ क्र.४), अरविंद माळी, मा. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) अविनाश सकपाळ, उपायुक्त (झोनिपू), संदीप खलाटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मा. उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) तुषार बाबर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×