२० ग्राहकांना लाखाचा गंडा
marathinews24.com
पुणे – Pune Online Fraud News : टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट पेज आणि वेबसाइट तयार करून मद्याच्या होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून १५ ते २० ग्राहकांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अर्जुन चव्हाण (वय ३५) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाइलधारक आणि बनावट वेबसाइट चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापासून १२ नोव्हेंबरपर्यंत हा प्रकार सुरू होता. आरोपींनी फिर्यादी यांच्या टॉनिक दुकानाच्या नावाचा वापर करून गुगलवर बनावट पेज तयार केले. त्यावर मद्यविक्रीसह घरपोच डिलिव्हरीची केली जाणार असल्याचे सांगितले. ग्राहकांनी जाहिरातीवरील मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर त्यांना ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले जात होते. त्यासाठी आरोपींकडून क्यूआर कोड पाठविण्यात येत होता. (Pune Online Fraud News) दुकानाचे नाव आणि माहिती पाहून ग्राहकांनी विश्वास ठेवत क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठविले. मात्र, पैसे भरल्यानंतरही ग्राहकांना मद्याची डिलिव्हरी मिळाली नाही. अशा प्रकारे १५ ते २० ग्राहकांची फसवणूक केली. आरोपींनी सुमारे ८० हजार ते १ लाख रुपयांची रक्कम उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक कोकाटे करीत आहेत.




















