विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मोबाइलचा तांत्रिक ताबा घेउन सायबर चोरट्यांनी तरूणाच्या बँकखात्यातील ६ लाख रुपये इतरत्र वळवून ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना ६ ऑक्टोबरला विश्रांतवाडीतील कळस गावामधील औदुंबर निवास या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात युपीआय धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमपीएससी करणार्या विद्यार्थ्यांना आंदोलन भोवलेब १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण विश्रांतवाडीतील कळस गावात राहायला असून, ६ ऑक्टोबरला त्यांचा मोबाइल बंद झाला होता. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांच्या बँकखात्याचा ऑनलाईनरित्या ताबा घेतला. बँकखात्यातून ६ लाख रुपये दुसर्या बँकखात्यात वर्ग केले. तक्रारदाराने मोबाइल सुरु केला असता, त्यांना बँकखात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.
जेष्ठाची ५ लाखांची फसवणूक
निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने ७७ वर्षीय नागरिकाला तब्बल ५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. वेबसाईटवर ५ रुपये भरण्यास सांगत ज्येष्ठ नागरिकाची ५ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सुब्बराव वेड्कट करूमंची (वय ७७, रा. बालेवाडी) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.






















