पुणे पोलिसांकडून हगवणे बंधूच्या शस्त्र परवाना प्रकरणाची कसून चौकशी

अन्यथा दाखल होणार नव्याने गुन्हा

marathinews24.com

पुणे – सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेचे पती शशांक आणि दीर सुशील यांनी पुण्यातील निवासाचा पत्ता दाखवून शस्त्र परवाना घेतल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांकडून त्यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला होता. हगवणे मुळशी तालुक्यातील भुकूमचे असून, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या हगवणे बंधूनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ५ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी – सविस्तर बातमी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती, सासू, सासरे, दीर, नणंदेला अटक करण्यात आली आहे. पती शशांक, दीर सुशील, तसेच निलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळविला. तिघांचे पिस्तूल जप्त केले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार शस्त्र परवान्यासाठी पोलिसांना दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

हगवणे बंधूनी शस्त्र परवान्यासाठी पौड पोलिसांकडे अर्ज केला होता. तत्कालिन ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शस्त्र परवाना नाकारला होता. त्यांनी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी वास्तव्याचा पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत दिली होती. शस्त्र परवाना अर्जासोबत देण्यात आलेला भाडेकरार दोन महिने जुना होता. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×