Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुणे पोलिसांकडून तेजवानीच्या घरांची झाडाझडती

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

कोरेगाव पार्क, पिंपरी चिंचवडमध्ये सर्च मोहीम; मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अटक असलेल्या शीतल तेजवानी हिच्या कोरेगाव पार्क आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली आहे. शुक्रवारी (दि.५) पथकांनी तिच्या घरी जाऊन विविध कागदपत्रे, दस्तऐवजासह इतर महत्वाच्या बाबींची तपासणी केली. सुमारे अडीच ते तीन तास सर्च मोहीम राबवून पोलिसांनी जमीन घोटाळा संदर्भातील काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. आणखी पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने प्राधान्य दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात – सविस्तर बातमी

मुंढवा परिसरात असलेल्या ४० एकर जमिनीच्या सात बाऱ्यावर २७५ जणांकडे मालकी होती. त्यांच्याकडून आरोपी शीतल तेजवाणी हिने २७५ जणांना आमिष दाखवून ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ घेतली होती. त्यानंतर ती जमीन २०२५ मध्ये अमेडिया कंपनीशी करार करून त्यांना हस्तांतरण केली.

प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार पार्थ पवार, दिग्विजय पाटील, तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे यांचे जबाब आधीच नोंदविले आहेत. तर, गुरुवारी तेजवानीला पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजवानीला सोबत घेऊन तिच्या कोरेगाव पार्क येथील आणि पिंपरी चिंचवड येथील दोन्ही घरांची झाडाझडती घेतली.

पार्थ पवार यांची चौकशी कधी ??

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीने मुंढव्यातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिंक गुन्हे शाखेने शीतल तेजवाणीचा दोन वेळा जबाब नोंदवला होता. जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याानंतर तिला गुरुवारी अटक केली. दरम्यान, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील याला नोटीस बजावून १ डिसेंबरला त्याचा जबाब घेतला. आता यातील मुख्य संचालक असलेले पार्थ पवार यांचा जबाब कधी नोंदवला जाणार, त्यांच्याकडे चौकशी कधी केली जाणार, पोलीस त्यांना चौकशीला कधी बोलावणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी झडती

आरोपी शीतल तेजवानी हिच्या पिंपरी चिंचवड येथील माहेरच्या घरी पुणे पोलीस पोहोचले होते. पोलिसांनी घराची झाडाझडती घेत तपासणी केली. गुन्ह्यातील महत्वाची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच ३०० कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पिंपरीच्या घरी गेले होते.शीतल तेजवाणी आणि तिचे पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचे माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पोलिसांना होती

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×