Breking News
Pune Traffic News : मेट्रोच्या कामानिमित्त चांदणी चौक ते कोथरूड जड वाहनांना बंदीPune Crime News : ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन सोन्याची अंगठी चोरलीPune Accident News : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Police News : कुराशच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात १४ पोलिसांसह २५ जणांना अटकPune Fire News : कोथरूडमध्ये गॅस गळतीमुळे कामगारांच्या घराला आगPune Hotel Prostitution Racket : पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटकाPune Police News : पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढलीTheur Maharshi Kaundinya Rishi Ashram : थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतातPune Girl Child Birth Ratio : ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा-डॉ. नीलम गोऱ्हेRapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहन

Pune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

Pune Police Suicide

औंधमधील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Police Suicide : पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने ओैंधमधील राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पाटील हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक होते.

पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस दलात भरती झाल्यानंतर ते पदोन्नतीने (श्रेणी) पोलीस उपनिरीक्षक झाले. उच्च न्यायालयातील कामासाठी ते बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईला जाणार होते. मात्र, ते मुंबईला गेले नाही. ओैंधमधील नागरस रस्त्यावरील एका सोसायटीत ते राहत होते. (Pune Police Suicide) बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ते घरी होते. त्यावेळी त्यांचा मुलगा घरात होता. घरातील सोफ्यावर बसलेल्या पाटील यांनी शासकीय पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा खोलीतून बाहेर आला. तेव्हा पाटील हे सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

‘पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांना आरोग्यविषयक समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते एक ते दोन महिने सुट्टीवर होते. गणेेशोत्सवातील बंदोबस्तासाठी ते कामावर रूजू झाले होते. आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे, असे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले. दरम्यान, पाटील यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ते पूर्वी खडक पोलीस वसाहतीत राहत होते. पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस दलात शाेककळा पसरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×