Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे पोलिसांचा टेक्नोसॅव्ही उतारा, गुन्हा नोंदणीसाठी घेणार एआयची मदत

गुन्हा नोंदणीत गतीमानता, प्रक्रिया होणार सुपर स्मार्ट

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो आता तुमच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी पुणे पोलिसांनी टेक्नोसॅव्हीचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या वेळेची बचत होणार असून, पोलिसांनाही वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. त्यासोबतच गुन्ह्यानुसार कलमे, एफआयआरचा ड्राप्ट वेगाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांनाही तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात सर्वात आधी एआयनुसार गुन्ह्याची नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या वेळीच बचत व्हावी. गुन्ह्यानुसार कलम, एफआयआरचा ड्राफ्टमधील किचकटपणा कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, त्याच्या माध्यमातून गुन्ह्याच्या स्वरूपानुसार संबंधित कलमांखाली आपोआप गुन्हा दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. संबंधित सॉफ्टवेअरच्या मदतीने प्राथमिक माहितीच्या आधारे एआयप्रणाली स्वतःच योग्य कायदेशीर कलमे सुचवणार आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून संबंधित पोलीस अधिकारी आवश्यक ते बदल करून अंतिम अपडेट करणार आहेत.

एआय तंत्रज्ञानाची अशी घेतली जाणार मदत

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार संबंधित स्टेशन अधिकारी एआय प्रणालीत माहितीची नोंद करणार आहे. त्याद्वारे काही मिनीटांमध्ये एआय प्रणाली व्यवस्थित ड्राफ्ट केलेली एफआयआर तयार करणार आहे. त्यामध्ये आवश्यक तो बदल करून काही मिनीटांत अधिकार्‍यांकडून गुन्ह्याची नोंद केली जाणार आहे. त्याची माहिती तत्काळ तक्रारदाराला दिली जाणार आहे. त्यामुळे वेळ, अचूकता, वादविवादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गुन्हा नोंदणीसाठी आवश्यक ती प्रणाली विकसित करण्याचे काम माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी कंपनीकडून करण्यात येत आहे. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर बाणेर पोलीस ठाण्यात राबवण्यात येत आहे. विशेषतः या उपक्रमामुळे गुन्हा नोंदणी प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुणे पोलिस प्रशासनानेही अत्याधुनिकतेची कास धरली असून, आता आम्ही आर्टिफिशल इंटिलिजेन्सचा (एआय) वापर सुरू केला आहे. प्रायोगिक तत्वावर बाणेर पोलीस ठाण्यात याची सुरूवात झाली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करताना लागणारा कमी वेळ, अचूकता, वादविवाद कमी होण्यास मदत होणार आहे.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×