Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती

मत्स्यव्यवसायास चालना देत आदिवासी भागात आर्थिक सक्षमीकरणाचा उद्देश

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी यांनी मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेतर्गत पुणे जिल्ह्यातील सन २०२५-२६ करिता प्राप्त परिपूर्ण प्रस्तावांस पुढील कार्यवाहीस्तव मंजुरी प्रदान केली आहे.

बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेटची सोय – सविस्तर बातमी

या बैठकीस सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पुणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय घटक वृद्धिंगत करण्याकरिता “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सह-योजना राबविण्यास शासन निर्णय क्रमांक-मत्स्यवि-११२५/प्र. क्र.७१/पदुम १४ दिनांक ४/९/२०२५ अन्वये मान्यता प्राप्त आहे.त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ९९ गावांतील आदिवासी क्षेत्रातील इच्छुक लाभार्थींकडून प्रस्ताव मागणीस्तव जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुषंगाने सदर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण असलेले प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जिल्हास्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती पुढे मंजुरीस्तव मांडण्यात आले होते.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सहयोजना राबविण्यात येत असून या योजनेमध्ये जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ९९ गावांचा धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेत समावेश आहे.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकास करण्यासाठी मूळ पायाभूत सुविधा तसेच आर्थिक सबलीकरण होऊन सामाजिक प्रवाहात आणणे तसेच मत्स्य व्यवसाय वृद्धिंगत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×