Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

नशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

व्यसनमुक्त राहा, शिक्षणाला प्राधान्य द्या – समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे

marathinews24.com

पुणे – दारु व अंमली पदार्थांसह समाज माध्यमांचेही व्यसन घातक असून यामुळे विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे, येत्या काळात भारत देशाला महासत्ता म्हणून उदयास येण्याकरिता तरुण पिढीसह विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन – सविस्तर बातमी

नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थाचा गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सफाई कामगारांच्या मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे उपस्थित होत्या. यावेळी प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त (व्यसनमुक्ती) मिना आंबाडेकर तसेच डॉ. विजय मोरे यांच्यासह सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. वाढती व्यसनाधीनतेचे प्रमाण, त्याचे शारिरीक व आर्थिक दुष्परिणाम तसेच व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×