Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

नारायणगाव, पारगावात सोनसाखळी चोरीसह दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळीला अटक

दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला बेड्या; हडपसर पोलिसांची कारवाई

तिघांना अटक; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – एसटी स्थानकात सोनसाखळी चोरीसह चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव, पारगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे २४ तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल मिळून ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

‘दाऊद’च्या नावाने उपसंचालकासह कुटुंबियांना मारण्याची धमकी – सविस्तर बातमी

दोन महिन्यांत नारायणगाव एसटी स्थानक परिसरात महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे अर्जुन कानीफनाथ भोसले (वय २७ मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, सध्या रा. कोपरगाव) याला ६ जूनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने मिळून २७ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले.

शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि पारगाव परिसरात मोटार सायकलवरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेणाऱ्या टोळीचाही पोलिसांनी शोध घेतला. गुप्त माहितीच्या आधारे ८ जूनला पोलिसांनी सापळा रचून ओंकार रंगनाथ शेंडगे (वय १९ रा. डोंगरगण, ता. शिरूर) आणि अजय बाळू देवकर (वय २७, रा. कवठेमळा, देवकरवस्ती, ता. शिरूर) यांना अटक केली. चौकशीत या दोघांनी पारगाव, शिक्रापूर, रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ६ तोळे सोन्याचे दागिने मिळून ९ लाख रुपयांचे दागिने, दुचाकी जप्त केली.दोन्ही कारवाईत आठ गुन्ह्यांची उकल झाली.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, नारायणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण सपकाळे, पारगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांदळे, पोलीस उपनिरीक्षक महादेव शेलार यांच्या पथकाने पार पाडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×