Breking News
Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत

‘दाऊद’च्या नावाने उपसंचालकासह कुटुंबियांना मारण्याची धमकी

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीचे नाव घेऊन रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या उपसंचालकांसह त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी डीआरआयचे उपसंचालक अभिषेक कुमार सिंह (वय ३३, रा. बोट क्लब) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले काही लॅपटॉप आणि मोबाईल कस्टम विभागाला सांगून सोडवले नाही, या कारणास्तव ही धमकी देण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी मुस्ताक शेख नामक व्यक्तीसह अन्य एका जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मार्केट यार्डातील दुकानातून वेलदोडे, रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे प्रादेशिक युनिट, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) येथे २०२४ पासून उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. सिंह हे त्यांच्या मूळ गावी जात असताना, ३ मे रोजी मुस्ताक शेख याने त्यांना फोन करून मी तुमचा बातमीदार मेहमूद याला ओळखतो, मी तुमच्याकडे बातमीदार म्हणून काम करण्यास इच्छूक असल्याचे सांगत, मला तुमच्यासोबत बोलायचे आहे असे सांगितले. त्यावेळी सिंह यांनी आपण नंतर बोलू असे त्याला कळवले. त्यानंतर ५ मे रोजी रात्री त्याने पुन्हा संपर्क साधून मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने पकडलेल्या एका लॅपटॉप व मोबाईलसंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलून मदत करण्याची मागणी केली. फिर्यादींनी त्यास नकार दिला. त्यानंतर मुस्ताक शेख याने ६ मे रोजी सिंह यांच्या व्हॉट्सअपवर १३ व्हॉईस नोट्स पाठवून त्यांना धमकी दिली. ‘तुम्ही मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटला माहिती दिल्याने माझ्या लोकांवर कारवाई झाली आहे. मी ३० वर्षांपासून तस्करीच्या व्यवसायात आहे. मला कोणी थांबवू शकले नाही.

माझे गुन्हेगारांशी संबंध आहेत. तुम्ही व तुमची फॅमिली पुणे शहरातून बाहेर कशी पडते ते बघतो, तुम्हाला चांगला धडा शिकवतो. मी तुझी पीएम ऑफिस येथे तक्रार करणार आहे. माझे ३० वर्षांपासून कस्टमशी संबंध आहेत’ असे म्हटले होते. त्यानंततर पुन्हा अन्य मोबाईल नंबरवरून सिंह यांना ‘मी गेल्या ३ दशकांपासून दाऊद इब्राहीम, डी कंपनी सिंडिकेटसाठी काम करतो. मी एटीएस साठी एक परिचित चेहरा आहे, असे सांगत सिंह व त्यांच्या डीआरआय कार्यालयाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, सहायक पोलिस निरीक्षक अशोक शिरसाठ हे पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×