मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मार्केट यार्डातील भुसार बाजरातील एका दुकानाची जाळी तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड, तसेच चार किलो वेलदोडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत भुसार बाजारातील व्यापारी संतोष कन्हैयालाल बोगावत (वय ५१, रा. हाईड पार्क, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव परिसरात घरफोडी; १ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगावत यांचे मार्केट यार्डातील भुसार बाजार बाजारात दुकान आहे. १३ जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानातील दरवाज्यावर असलेली जाळी उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील दहा हजारांची रोकड, तसेच चार किलो वेलदोडे असा मुद्देमाल लांबविला. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.
किराणा माल दुकानात चोरी
लोणी काळभोमधील किराणा माल दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड, तसेच मुद्देमाल असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत विकास बिरजू गुप्ता (वय ४६, रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी परिसरात गुप्ता यांचे सोमेश ट्रेडर्स हे दुकान आहे. चोरट्यांनी १८ जून रोजी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड, तसेच दुकानातील वस्तू चोरून नेल्या. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.























