Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीला

माॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पर्वती येथील शाहू वसाहतीतील एका घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ महिला पर्वती भागातील शाहू वसाहत परिसरात राहायला आहेत. अनिल वाॅशिंग सेंटरजवळ त्यांचे बैठे घर आहे. १८ जून रोजी घरात कोणी नसताना चोरटा घरात शिरला. त्याने कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. कपाटातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. ज्येष्ठ महिलेच्या घरातून ऐवज लांबविणारा चोरटा माहितगार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.

शहरात गेल्या आठवडभरापासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर, सिंहगड रस्ता, तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला.

मंदिरातून चांदीचे पूजा साहित्य चोरी

लोहगाव येथील एका मंदिरातून चोरट्यांनी ३० हजार रुपयांचे चांदीचे पूजा साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील वडगाव शिंदे गावात श्री महादेव मंदिर आहे. शुक्रवारी (१९ जून) मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील चांदीचे पूजा साहित्य चोरुन चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने लोहगाव परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच काडतूस जप्त करण्यात आले. सुफियान शब्बीर खान (वय २७, रा. गुरुद्वारा काॅलनी, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सातमधील पोलीस कर्मचारी नीलेश साळवे आणि प्रशांत कापुरे हे लोहगाव परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी हरणतळे रस्त्यावर एक जण येणार असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस जप्त करण्यात आले. खान याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा कट रचणे असे गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे विमानतळ आणि चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कुणाकडून पिस्तूल खरेदी केले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×