Breking News
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीलाबारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

पुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूक

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात

संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिष दाखवून लाखो रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला जात आहे. विशेषतः उच्च शिक्षितही जाळ्यात अडकत असून, दिवसेंदिवस फसवणूकीचा आलेख उंचावला आहे. सायबर चोरट्यांनी चौघांची २९ लाख १६ हजार १४७ रुपयांची फसणूक केली असून, याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार? – सविस्तर बातमी

डेक्कन परिसरातील ३५ वर्षीय महिलेची १९ फेब्रुवारी ते २५ मे २०२५ या कालावधीत सायबर चोरांनी फेक ई-मेल आयडी वरून फेक अकाउंट डिटेल्स पाठवून ५ लाख १४ हजार ३९७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) देवतळे करत आहेत. तर शिवाजीनगर येथील ३६ वर्षीय महिलेची २६ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान, सायबर चोरांनी २ लाख ९० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला सायबर चोरांनी कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत तुमच्या नावे असलेले क्रेडिट कार्ड २४ तासात ॲक्टिवेट होईल असे सांगितले. त्यानंतर महिलेने पेट्रोल पंपावर कार्ड स्वॅप केले असता, त्यांना क्रेडिट लिमिट संपल्याचे सांगण्यात आले. कस्टमर केअरला त्यांनी विचारणा केली असता २ लाख ९० हजार
रुपये डेबिट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलिस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.

धायरी येथील ३४ वर्षीय तक्रारदाराला १० मे ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत सायबर चोरांनी संपर्क साधन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत तक्रारदाराने १६ लाख ३६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदाराने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत, वडगावशेरी येथील २४ वर्षीय युवकाची १४ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत सायबर चोरांनी संपर्क साधून टास्कच्या नावाखाली ३ लाख ७५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) धस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×