Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

बिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?

बिल्डर अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज

व्हायरल व्हिडीओमुळे जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलीस घेणार न्यायालयात धाव

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्‍डर विशाल अग्रवाल याच्‍या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर व्हॉट्सॲप स्टेटसवर जल्लोषाचा व्हिडीओ ठेवल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी येत्या २३ जून रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली. यासाठी विधी व न्याय विभागाची परवानगी मिळविली आहे.

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल – सविस्तर बातमी 

कल्याणीनगर येथील भीषण पोर्शे अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुराव्यांशी छेडछाड केल्‍याचे समोर आल्‍यानंतर विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली होती. पुढे सर्वोच्च न्यायालयाने काही कठोर अटींसह त्याला जामीन मंजूर केला होता. जामीनाच्या अटींनुसार मृतांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे मानसिक किंवा शारीरिक त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. मात्र, जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विशाल अग्रवाल आनंदोत्सव साजरा करत असल्याचे दिसत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे पोलिसांच्या तपासात संबंधित व्हिडीओ विशाल अग्रवाल याने स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्याचे समोर आले आहे. हा स्टेटस पाहिलेल्या दोन व्यक्तींचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. हे जबाब आणि उपलब्ध डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर करून जामीनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

विशाल अग्रवाल याने हा व्हिडीओ २०२३ मधील जुना असल्याचा दावा केला होता. त्याचा जामीन मिळाल्यानंतरच्या कोणत्याही जल्लोषाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी व्हिडीओ व्‍हायरल झाल्‍याची बाब गांभिर्याने घेतली आहे. व्हिडीओ जुना असला तरी तो जामीनानंतर लगेच स्टेटसवर ठेवणे हे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावणारे कृत्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील संवेदनशीलता, देशभरात निर्माण झालेली चर्चा आणि मृतांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था लक्षात घेता जामीनाच्या अटींचा भंग झाल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×