प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी भागवत गुंडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलोकसत्ता प्रतिनिधी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रखवालदा म्हणून काम करतो. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात रिक्षाचालक पवार हे थांबले होते. त्या वेळी आरोपीने वैदुवाडीला जाण्यासाठ किती भाडे घेणार आहे, अशी विचारणा केली. भाड्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने रिक्षाचालक पवार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातला. घटनेत पवार जखमी झाले. पोलीस हवालदार मुंढे तपास करत आहेत.
किरकोळ वादातून तरुणाला मारहाण
किरकोळ वादातून तरुणाला बांबूने मारहाण केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. याप्रकरणी रोहित गालफाडे याच्यासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश संभाजी वाघमारे (वय ३२, रा. मोझे आळी, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे हे १८ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास धानोरी जकात नाका परिसरातून निघाले होते. त्या वेळी वाघमारे यांच्या ओळखीतील आरोपी हे एका मद्यविक्री दुकानाजवळ थांबले होते. या परिसरात काय करता, अशी विचारणा त्यांनी आरोपींकडे केली. त्या वेळी झालेल्या वादातून आरोपींनी त्यांना बांबूने मारहाण केली. पोलसी हवालदार सातपुते तपास करत आहेत.



















