Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

Construction worker death

ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रंगाचे काम करण्यासाठी बांबू बांधण्याचे काम करत असताना आठव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती सुरेशसाह बंजारिया असे मयत कामगाराचे नाव असून, हेमंत नागेश चव्हाण (वय ४५, रा. आनंद पार्क, शिवशक्ती नगर, वडगाव शेरी) असे ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई विक्रम केशव खिलारी (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात चार पिस्तुलांसह तिघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरातील आदित्य गार्डन सिटीच्या फेज तीन मधील आय इमारतीखाली गुरूवारी (दि. १८) दुपारी सव्वा चारच्या सुमारास ज्योति बंजारिया हा त्याच्या अन्य साथीदारांसह गुरुवारी रंगाचे काम करण्यासाठी बांबू बांधत होता. त्यावेळी ठेकेदार हेमंत चव्हाण याने सुरक्षेततेच्या कोणत्याही उपाययोजना व साधने त्यांना पुरवली नव्हती. नियमानुसार सेफ्टी नेट देखील लावण्यात न आल्याने बंजारिया आठव्या मजल्यावरून खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा हे करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भारती विद्यापीठ भागातील त्रिमुर्ती चौकात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. बद्री बिंची (वय ५१, सध्या रा. भारती विद्यापीठ आवार, नवीन इमारत लेबर कॅम्प) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव अहे. दुचाकीस्वार आकाश ज्ञानेश्वर चोरघे (वय २८, रा. मेगा सिटी, कर्वे रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजदेव सूधय भारती (वय ४०, सध्या रा. भारती विद्यापीठ आवार, नवीन इमारत लेबर कॅम्प) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंची हे बांधकाम मजूर आहेत. १४ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास बिंची हे भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या बिंची यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक दराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×