Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

छळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्या

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

पती, सासूसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मुलं होत नसल्याने छळ केल्याने संगणक अभियंता तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. संगणक अभियंता तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, तसेच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायणगाव, पारगावात सोनसाखळी चोरीसह दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी 

दीप्ती प्रदीप एकशिंगे (वय २७, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत दीप्ती यांचे भाऊ डाॅ. किरण तुषार दूधबळे (वय ३०, रा. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती प्रदीप विठ्ठल एकशिंगे, सासू सुरेखा, तसेच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती मूळची गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी गावची रहिवासी होती. तिचे पती संगणक अभियंता आहेत. एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करताना त्यांची ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दोघांनी पुण्यात प्रेमविवाह केला. विवाहानतर मुलं होत नसल्याने पती, सासू, तसेच नातेवाईकांकडून दीप्तीचा छळ सुरू करण्यात आला. तिला टोमणे मारण्यात आले. छळामुळे तिने १७ जून रोजी इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली, असे दीप्तीचे भाऊ डाॅ. दुधबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार अडागळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×