Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune Road Accident : कंटेनरवर दुचाकी आदळून तरुणीचा मृत्यू

Bopdev Ghat Car Accident

दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी

marathinews24.com

पुणे – Pune Road Accident : कंटेनरवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी झाली. साक्षी अमोल सावंत (वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी रेणुका बलभीम कांबळे (वय २२) जखमी झाली. तिच्यावर रुग्मालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कंटेनर चालक योगेश नागनाथ सातपुते (वय ३५, रा. कौठळी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाकल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई नागेश कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

जेष्ठाच्या मोबाइलचा घेतला ताबा, ८ लाखांचा घातला गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार साक्षी सावंत आणि तिची मैत्रिण रेणुका कांबळे बाह्यवळण मार्गावरुन रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी पावणेतीनच्या सुमारास निघाल्या होत्या. नवीन कात्रज बाेगद्याजवळ थांबलेल्या १८ चाकी कंटेरनवर दुचाकीस्वार साक्षी आदळली. (Pune Road Accident) अपघातात दुचाकीस्वार साक्षी आणि तिची मैत्रीण रेणुका गंभीर जखमी झाल्या.अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्तळी भेट दिली. दोघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच साक्षीचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कंटेनर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती चौकशीत मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×