Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यातील बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईचा डोस

पुण्यातील बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईचा डोस

१५ दिवसांत १ हजार ८७ रिक्षा चालक जाळ्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात बेशिस्तपणे रिक्षा चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरूद्ध पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अवघ्या १५ दिवसांत तब्बल १ हजार ८७ बेशिस्त रिक्षा चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक युनिफॉर्म परिधान न करणार्‍यांच्या समावेश आहे. त्याखालोखाल जास्त प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे.

पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

वाहतूक विभागाने शहरातील विविध भागात १० ते २६ नोव्हेंबर कालावधीत बेशिस्त रिक्षा चालकांविरूद्ध मोहिम राबविली होती. त्याद्वारे अवैधपणे चालणार्‍या रिक्षावर कारवाई करण्यासाठी एक अधिकारी, चार अमलदारांचे पथक तैनात केले होते. संबंधित पथकाने १ हजार ८७ बेशिस्त रिक्षा चालकांविरूद्ध कारवाई करीत दंड वसूल केला आहे. त्यासोबतच पुन्हा अशारितीने नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. प्रवाशांसोबत अरेरावी करणे, जवळचे भाडे नाकारणे, युनिफॉर्म न घालणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

बेशिस्त रिक्षा चालकांविरूद्धची कारवाई

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे – २३४, नो पार्किंग – ९२, फ्रंट सीट – ३६, युनिफॉर्म नसणे- ४२४, कागदपत्रे जवळ न बाळगणे – १६, सिग्नल उल्लंघन – १६, अनधिकृत रिक्षा थांब्यावर थांबणे – ३८, रॉंग साईड वाहतूक – ३६, भाडे नाकारणे – १३८, इतर विविध कारवाई -५७

रिक्षा चालकांनो हे नियम पाळाच

– निर्धारित रिक्षा स्टँडवरच थांबावे
– रस्त्यावर अनधिकृत पार्किंग टाळावे
– सिग्नल व लेन शिस्त पाळावी
– प्रवाशांशी नम्रपणे, प्रामाणिकपणे वागावे
– भाडे मीटरप्रमाणेच आकारावे.
– सुव्यवस्थित वाहतूक सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.

शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभाग वेळोवेळी प्रयत्न करीत आहेत. रिक्षा चालकांसह इतर वाहन चालकांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. बेशिस्तपणे स्वतःसह इतरांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×