कसब्यातील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी लावले  ७ थर 
marathinews24.com

पुणे : बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. शनिवारी रात्री ९ वाजून ३० मिनीटांनी चौथ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या गोविंदाने हंडी फोडली.

गोपाल कृष्ण… च्या जयघोषात इस्कॉन मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा – सविस्तर बातमी 

बेलबाग चौकाजवळ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या पारंपरिक जागेत जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, प्रतिक घोडके यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी भव्य ४० फूट उंचीच्या एलईडी स्क्रिनवरुन श्रीकृष्ण लीला दर्शन गोपाळभक्तांना झाले.

कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मच गया शोर… बोल बजरंग बली की जय… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×