Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

सोशल मीडियावर झालेली ओळख महागात, तरूणीवर लैंगिक अत्याचार

आरोपी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर झालेली ओळख तरुणीला महागात पडली असून, तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून तरुणीला लॉजवर नेले. तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी घेऊन ती परत देण्यासाठी तिला शरीर संबंधात भाग पाडले. त्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणणार्‍या एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सौरभ धोत्रे ( वय २५, रा, दिपबंगला चौक पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार मे २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला.

बस प्रवासात महिलेचे एक लाखाचे मंगळसूत्र चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीची मे २०२४ मध्ये इन्स्ट्राग्रामवर तरुणासोबत ओळख झाली. त्यातून त्याने तरूणीला भेटण्यास बोलवून तिला लॉजवर नेले. तेथे तिला तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सेानसाखळी ताब्यात घेतली. त्यानंतर ती सोनसाखळी परत करण्यासाठी त्याने तिच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार केले. यानंतर तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीने तिची सोनसाखळी परत न करता तिच्यासोबत बोलणे बंद केले. भेटणे बंद केल्याने त्याने तरूणीचा बनावट इस्टाग्राम आयडी तयार केला. त्यावरती तरूणीचे व आरोपीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने तरूणीच्या वडीलांच्या दुकानावर जाऊन ७० हजार रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आरोपीने त्याचे आणि तरूणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×