Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

सोनसाखळी हिसकावून नेणारा रेकॉर्डवरील जेरबंद

तब्बल ५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने केली अटक

marathinews24.com

पुणे – महिलांच्या सोनसाखळी हिसकाविणार्‍या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. सराईताकडून चोरीची दुचाकी आणि मंगळसूत्र असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तरुण बलाराम झा (वय २६, रा. पठारे वस्ती, सुपेनगर, खराडी, मुळ रा. पाटणा, बिहार) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात साडेचार लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला १८ मे रोजी केशवनगरमधील सोनाईनगर येथे नातेवाईकांच्या घरी सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून दुपारी तीन वाजता पायी घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. मुंढवा पोलिसांसह दरोडा व वाहन चोरी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड व त्याचे सहकारी समांतर तपास करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार शशिकांत नाळे, विनायक साळवे यांना २३ मे रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगार तरुण झा याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली. तो मगरपट्टा येथे थांबल्याचे समजताच पथकाने मगरपट्टा परिसरात जाउन त्याचा घेत ताब्यात घेतले.

आरोपी तरुण झा हा भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलिस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र व दुचाकी असा दीड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार, सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड, पोलिस अंमलदार शशिकांत नाळे, विनायक साळवे, मच्छिंद्र डापसे, बाळासाहेब तनपुरे, राजू पुणेकर गणेश ढगे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×