फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचा नागरिकांना इशारा

फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचा नागरिकांना इशारा

अधिकृत संकेतस्थळावरील तपशीलच ग्राह्य धरावेत

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे Fake एसएमएस तसेच व्हॉटसअँप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संदेशांमध्ये नागरिकांकडून ओळख तपासण्याच्या नावाखाली “Vahun Parivahan” किंवा इतर अँप डाऊनलोड करण्यास भाग पाडले जात असून, हे संदेश पूर्णतः बनावट असल्याचे वाहनधारकांच्या तक्रारीतून समोर आले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

अशा फसवणुकीच्या हेतूने पाठविण्यात आलेल्या मेसेजचा नमुना पुढीलप्रमाणे आढळून येतो Dear Vehicle Owner/Driver, This is to inform you that you have been issued a traffic challan.. Challan Number: LA21071734311687, To confirm your identity and view the evidence, please install Vahun Parivahan app.The app will provide you with the necessary Regards RTO OFFICE

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO Pune) ई-चलान संदर्भातील संदेश हे वरील नमुन्यापेक्षा पूर्णतः भिन्न असतात. RTO मार्फत जारी करण्यात येणारा मूळ संदेश पुढीलप्रमाणे MH12XXXXXX was found in public place with violation of MV Act, 1988.Kindly see the notice https://rtomh.in/print?id=Gka5JFm and pay fine amount.RTO Pune असा असतो.

तरी नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या कोणत्याही संदेशातील लिंक उघडू नये अथवा त्यावर क्लिक करू नये. अशा बनावट मेसेजकडे तात्काळ दुर्लक्ष करावे आणि सायबर गैरप्रकाराच्या स्वरूपात तक्रार सायबर पोलीस विभागाकडे नोंदवावी. नागरिकांनी सत्यापित माहितीचा वापर करावा, अधिकृत संकेतस्थळावरील तपशीलच ग्राह्य धरावेत असे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×