Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेले

पाषाणमधील शासकीय इमारतीच्या आवारातून चंदनाची चोरी

खडकीतील खासगी कंपनीत चोरी

marathinews24.com

पुणे – शहरातील खडकीतील खासगी कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रखवालदाराने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रखवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोलीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत किर्लोस्कर इंडस्ट्रीज कंपनी आहे. कंपनीच्या आवराात मध्यरात्री तीन ते चार चोरटे शिरले. गस्त घालणाऱ्या रखवालदाराने चोरट्यांना पाहिले. त्यांनी चोरट्यांना हटकले. तेव्हा चोरट्यंनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत. शहर परिसरातील बंगले, सोसायटीचे आवार, शासकीय आणि शैक्षणिक संस्थेच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

शुक्रवार पेठेत दुकानात चोरी

दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी चांदीची नाणी, रोकड, पितळी मूर्ती असा एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. याबाबत व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे शुक्रवार पेठेत तांबे, स्टिलची भांडी विक्री, तसेच मोड घेण्याचा व्यवसाय आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड, चांदीची नाणी, पितळी मूर्ती, भांडी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार हर्षल दुडम कपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×