Breking News
Seva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणा

संजू राठोडचं “पिल्लू” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोशल मीडियावर गाण्याची क्रेझ

जीएमई म्युझिक प्रस्तुत “पिल्लू” गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संजूला झाली ॲलर्जी, सेटवर बिबट्यांचा वावर, दिग्दर्शक अभिजीत दाणीने सांगितला भयानक किस्सा

marathinews24.com

पुणे – गुलाबी साडी आणि शेकी गाण्यांच्या यशानंतर गायक संजू राठोड याचे पिल्लू गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणं तुम्ही जीएमई म्युझिक या चॅनेलवर पाहू शकता. या गाण्याची निर्मिती श्रीनाथ कोडग आणि चेतन चव्हाण यांनी केली आहे तर या रोमँटिक गाण्याचं दिग्दर्शन अभिजीत दाणी याने केलं आहे. हे गाणे आपल्या भावनिक कथानक आणि हृदयस्पर्शी सुरावटींमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहे.

जलसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण; ५० हेक्टर क्षेत्राला होणार लाभ; २०० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा – सविस्तर बातमी

या गाण्यात संजू राठोड आणि सेजल नायकरे यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळेल. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन जी-स्पार्क ने केल आहे. हे गाण संजू राठोड आणि मयुरी हरिमकर यांनी गायलं आहे. पिल्लू गाण्याच्या गीतरचना संजू राठोड याने केले असून, हे गाणं यंदाच्या श्रावणी पावसात एक परिपूर्ण रोमँटिक ट्रीट ठरणार आहे.

पिल्लू गाण्याविषयी संजू राठोड सांगतो, “पिल्लू गाणं मी स्वतः लिहिल असून याचं कम्पोझिशन मी स्वतः केल आहे. हे गाणं माझ्या फार जवळच आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही माझ्या गुलाबी साडी आणि शेकी गाण्यांना जस प्रेम दिलत तसच प्रेम पिल्लू गाण्याला देखील द्या. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा.”

दिग्दर्शक अभिजीत दाणी पिल्लू गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, “पिल्लू गाणं नाशिक येथील घोटी भागातील दौंडत गावात झालं आहे. या गावात नयनरम्य ठिकाण आहेत परंतु येथे बिबट्यांचा वावर देखील आहे. त्या गावातील गावकऱ्यांनी आम्हाला सांभाळून शूट करा अस सांगितल होत. हे गाव नाशिक शहरापासून दूर आहे. आमचा प्रोडक्शन मॅनेजर नाशिक सिटीमधून काही सामान आणायला गेला होता तेव्हा त्यांच्या गाडीसमोरून बिबट्या आडवा गेला. तेव्हा ते सेटवर आले आणि त्यांनी हा किस्सा सांगितला. तेव्हा आम्ही सगळे घाबरलो होतो परंतु टीमने खूप सपोर्ट केला. सगळ्यांनी न घाबरता शूट पूर्ण केले.”

पुढे तो सांगतो, “पिल्लू गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संजूला धुळीची अलर्जी झाली होती. त्याचे ओठ आणि डोळे सुजले होते. त्याला त्वरित आम्ही डॉक्टरकडे नेल. तब्बल ५ तासानंतर त्याची सूज उतरली आणि आम्ही फर्स्ट टेक घेतला. हे गाण शूट करताना खूप चॅलेंजेस आले. पण सगळ्यांच्या सपोर्टने आज गाण प्रदर्शित झाल आहे. आणि प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. त्यामुळे आनंद होतोय.”

गाणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×