Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

सातबाऱ्यावर नाव लावून देण्याच्या बहाण्याने २६ लाखांचा घातला गंडा

marathinews24.com

पुणे – सातबारा उताऱ्यावरुन कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एकाविरुद्ध मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रसाद उद्धव शिरसाठ (वय ५०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर भाडेकरूसह घरमालकांविरूद्ध होणार कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी भागात राहायला आहेत. तक्रारदाराचे नाव वडिलोपार्जित मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावरुन कमी झाले होते. आरोपीशी त्यांची २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने महसूल विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली होती. सातबारा उताऱ्यावरुन कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपीने गेल्या चार वर्षात त्यांच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये रोख स्वरुपात घेतले.

आरोपीने सातबारा उताऱ्यावर नाव न लावून दिल्याने तक्रारदाराने विचारणा केली. तेव्हा आरोपीने उडवाउडवीचे उत्तरे दिली. आरोपीला पैसे परत मागितले. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×