Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

फुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला

बाणेर पोलिसांनी केली तिघांना अटक

marathinews24.com

पुणे – मित्राच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी फुकट गोवऱ्या व लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील टेंडरधारक व्यावसायिकाने विद्युत स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सत्तूरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पाषाण येथे घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन उत्तम रणपिसे (वय ३५, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

संतोष देशमुख हत्येतील आरोपी जयराम चाटे जेलबाहेर – सविस्तर बातमी 

अजय अशोक माकर (वय २५), अतिश मारुती चव्हाण (वय २७) आणि रामू नर्सराज मुप्पाला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ११ मार्चला रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास पाषाण येथील शिवशक्ती चौकाजवळ बालन सुतार यांच्या कार्यालयासमोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन रणपिसे हे औंध स्मशानभूमीत स्मशान ऑपरेटर म्हणून काम करतात. अजय माकर याला सुतारवाडी स्मशानभूमीत गोवऱ्या व लाकडे पुरवण्याचे टेंडर मिळाले आहे. दरम्यान, रणपिसे यांचा मित्र रोहित आडुळकर यांच्या चुलत्याचे निधन झाले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रणपिसे यांनी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडे मोफत दिली होती. याचा राग मनात धरून अजय माकरने ११ मार्चला रात्री रणपिसे यांना विठ्ठल मंदिराजवळ बोलावले. तेथे माकरने “तू लाकडे, गोवऱ्या फुकट का दिल्या?” असा जाब विचारत शिवीगाळ केली.

वाद वाढल्यानंतर त्याच्या साथीदारांनी रणपिसे यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली. त्यानंतर माकरने सत्तूरने त्यांच्या दोन्ही खांद्यांवर वार केले, तर तिसऱ्या आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. जखमी रणपिसे यांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. बाणेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक बालाजी सानप पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×