Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शिल्पकार राम सुतार हे महाराष्ट्राचे मानबिंदू- डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान

marathinews24.com

मुंबई – देश-विदेशात शिल्पकलेच्या माध्यमातून भारताची कीर्ती उंचावणारे, १०१ वर्षीय ऋषीतुल्य शिल्पकार राम सुतार यांचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतारही उपस्थित होते. राम सुतार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत पन्नासहून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती केली आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखा जगप्रसिद्ध प्रकल्प, संसद भवनातील महात्मा गांधींची प्रतिमा तर सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांसह अनेक महान नेत्यांची शिल्पकृती त्यांच्या हस्ते साकारली गेली आहे.

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर – सविस्तर बातमी

शिल्पातील सूक्ष्म मानवी भावना आणि वास्तवदर्शी स्वरूपामुळे त्या कलाकृती इतिहासाची साक्ष देत राहतात. गौरव व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राम सुतार हे फक्त शिल्पकार नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे संवाहक आहेत. त्यांनी आपल्या कलेतून देशभक्ती, एकात्मता आणि मानवी मूल्यांचा संदेश दिला आहे. १०१ वर्षांच्या वयातही त्यांचा कलाविष्कार जिवंत आणि प्रेरणादायी आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. राम सुतार यांना यापूर्वी पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६), टागोर पुरस्कार (२०१६) यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×