सिक्कीमधील कंपनीच्या नावे बनावट औषधांची विक्रीचा प्रकार उघड

सदाशिव पेठेतील वितरकासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सिक्कीममधील औषध कंपनीच्या नावे बनावट ओैषध विक्रीचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशसन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत अन्न आणि ओैषध प्रशासन विभागातील निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाशिव पेठ, कर्वे रस्ता, उत्तर प्रदेशातील लखनौ, तसेच बिहारमधील गोपालगंज भागातील ओैषध विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील उत्खनन गैरव्यवहार भोवला; ४ तहसीलदारांसह १० जण निलंबित – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीममधील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या टिप्सिन याब बनावट ओैषधाची विक्री होत असल्याची माहिती ‘एफडीए’च्या पथकाला मिळाली. १६ ऑक्टोबर रोजी ‘एफडीए’च्या पथकाने सदाशिव पेठेतील एका वितरकाच्या दुकानातून ओैषधाचे नमुने ताब्यात घेतले. सदाशिव पेठेतील ओैषध वितरकाने उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका वितरकाकडून ओैषध खरेदी केल्याची माहिती मिळाली. एफडीएच्या पथकाने लखनौतील वितरकाची चौकशी केली. तेव्हा गोपालगंजमधील एकाने दोन कोटी २३ लाख रुपयांची ओैषध खरेदी केली होती. ही रक्कम त्याने एकाला रोख स्वरुपात दिली होती. गोपालगंजमदील कंपनीचा परवान्याची मुदत २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपल्याची माहिती चौकशीत मिळाली.

हे ओैषध सिक्कीमधील टेरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेव्हा बनावट ओैषध विक्रीचा प्रकार उघडकीस आला. ‘एफडीएकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. बनावट ओैषधांची विक्री किवा खरेदी केल्यास सात ते दहा वर्षांचा कारावास किंवा १० लाख रुपयांचा दंडाची शिक्षा आहे. बनावट ओैषधांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध एफडीएकडून कारवाई करण्यात येणार आहे’, असे अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांंनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×