Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोथरूडमध्ये जेष्ठाची मोटार चोरीला

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी जवळून चोरट्यांनी जेष्ठाच्या मालकीची ४ लाख रूपयांची मोटार चोरून नेली आहे. ही घटना २८ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय जेष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअरमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, २८ नोव्हेंबरला त्यांनी मालकीची मोटार उजवी भुसारी कॉलनीजवळ शृंंगेरी मठाच्या भिंतीजवळ उभी केली होती. त्यावेळी चोरट्यांनी उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीची चोरी केली आहे. गाडी दिसून न आल्यामुळे तक्रारदाराने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अमलदार सुळ तपास करीत आहेत.

फ्लॅटमधून पावणेतीन लाखांचे गंठण चोरीला

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून २ लाख ७० हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना २९ नोव्हेंबरला दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खराडीतील यशांकुर अपार्टमेंट, चौधरी वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खराडीतील चौधरी वस्ती परिसरातील अपाईटमेंटमध्ये राहायला आहे. २९ नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास तक्रारदार खरेदी करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील २ लाख ७० हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. बाहेरहून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी खराडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकणी सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×