शीतल तेजवाणीची सलग ६ तास चौकशी

पोलिसांनी शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला

मुंढव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवाणी हिची पुणे पोलिसांनी गुरुवारी ( दि.२०) सलग ६ तास चौकशी केली. तेजवाणीने महार वतनाच्या व्यक्तींकडून पॉवर ऑफ आटर्नि करून घेतलेले कागदपत्रे तसेच अमेडिया कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी पुन्हा शीतल तेजवाणीला बोलविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अवैध मद्यवाहतूक, विक्री व बनावट मद्यनिर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, बोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणी यांचा संबंध नसल्याचे देखील पोलिसांनी नंतर स्पष्ट केले होते.

मुंढवा जमीन प्रकरणात महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये शीतल तेजवाणी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. नंतर २०२५ मध्ये ही जमीन शीतल तेजवाणी हिने अमेडिया कंपनीसोबत करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता.

पुणे पोलिस आता नेमका व्यवहार काय झाला या अनुषंगाने तपास करत आहे. सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीला बोलावले होते, हेमंत गवंडे चौकशी झाली. आता बुधवारपासून शीतल तेजवाणीची पोलिसांकडे चौकशी सुरू आहे. गुरूवारी पोलिसांनी सलग ६ तास शीतल तेजवाणीकडे चौकशी केली.चौकशीत पोलिसांनी नेमक संबंधित व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेताना त्यांना काय मोबदला दिला का, कशाच्या आधारावर पॉवर ऑफ अॅटर्नी केली, अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार कशा पद्धतीने झाला, याअनुषंगाने ही चौकशी झाली तसेच सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

संबंधित व्यक्तींना जबाबासाठी बोलावले

शीतल तेजवाणी हिला तब्बल २७५ व्यक्तींनी पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. काही चार व्यक्तीमध्ये एकत्रित कागदपत्रे केली आहेत, तर काहींची वैयक्तिक देखील आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्या सर्व व्यक्तींनाही शुक्रवारी पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्या जबाबानंतर अनेक गोष्टींचा उलघडा होईल असे पोलिस सांगत आहेत. नेमका या व्यक्तींना मोबदला काय भेटला, हे अद्याप समोर आले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×