Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील कोंढवा, महंमदवाडी परिसरात शिवसेना प्रचाराचा जोर

पुण्यातील कोंढवा, महंमदवाडी परिसरात शिवसेना प्रचाराचा जोर

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत रॅली-सभांचे आयोजन

maratinews24.com

पुणे – महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंढवा परिसरातील विविध प्रभागांत उत्साही प्रचार कार्यक्रम राबवण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचाराला भरघोस पाठिंबा व्यक्त केला.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध – सविस्तर बातमी 

रविवारी ( दि.११) प्रभाग १९ (कोंढवा खुर्द-कौसर बाग) मध्ये तस्मीन पटेल, जहीर शेख आणि जुनेद शेख यांच्या प्रचारार्थ ज्योती हॉटेल चौक ते कौसर बाग, शीतल पेट्रोल पंप कोंढवा पर्यंत रॅली काढण्यात आली. डॉ. गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील ही रॅली मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहभागाने यशस्वी झाली.

प्रभाग ४० (कोंढवा बु.-येवलेवाडी) मध्ये संगीता ठोसर आणि पुष्पा मेमाणे यांच्या निवडणूक कार्यालयाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळीही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून प्रचारात सहभाग घेतला. तर प्रभाग ४१ (महमंडवाडी-उंड्री) मध्ये सारिका पवार, प्रमोद भानगिरे, स्वाती टकले आणि मच्छिंद्र दगडे यांच्या प्रचारार्थ ओरिएंट पॅलेस येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली. सभेला संबोधित करताना डॉ. गोऱ्हे यांनी चारही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा केला.

सभेत डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाना भानगिरे यांच्या प्रभागातील विशेष लक्ष आणि शिवसेनेची ओळख अधोरेखित केली. “शिंदे साहेबांनी लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत, त्याची प्रसिद्धी समाज माध्यमातून आणि भेटीगाठींतून करावी, जेणेकरून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल,” असे आवाहन त्यांनी केले. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्ते, ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर नागरिकांना विचारात घेऊन आराखडा तयार करण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. “या प्रभागात विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे..पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, कोंढवा परिसरात पक्षाची पकड मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×