न्यायालयाचे पकड वॉरंट असतानाही देत होता गुंगारा
marathinews24.com
पुणे – Sinhagad Road Crime News : न्यायालयाने पकड वॉरंट जारी केलेले असतानाही गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. साई रामदास पाटोळे (वय २३, रा. अमृता नगर, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दुचाकी अपघातात जावयाचा मृत्यू झाल्याचा बनाव – सविस्तर बातमी
युनिट एकचे पथक ७ नोव्हेंबरला पाहिजे, फरार, तडीपार तसेच मोक्का गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत त्यावेळी पोलीस अंमलदार विनोद चव्हाण यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डेक्कन पोलीस ठाण्यातील पकड वॉरंटमधील आरोपी साई रामदास पाटोळे हा सिंहगड रोड परिसरातील आपल्या घरी आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घराला कुलूप असल्याचे दिसून आले. परिसरात चौकशी केली असता आरोपी घरातच असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दरवाजा वाजवला असता एकजण बाहेर आला. त्याच्याकडे नाव विचारले असता त्याने साई रामदास पाटोळे असे सांगितले. न्यायालयात तारखेला हजर का राहत नाही, अशी विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. Sinhagad Road Crime News अधिक चौकशी केली असता त्याच्याविरोधात विशेष खटला क्रमांक ७२६/२०२१ मधील पकड वॉरंट प्रलंबित असल्याचे तसेच तो वर्षभरापासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार भारत भोसले, चव्हाण, जगताप, नांगरे यांनी केली.




















