Breking News
Pune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यात

अफुच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तस्कर अटकेत

अफुच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तस्कर अटकेत

५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

marathinews24.com

पुणे – अफुच्या बोडांचा चुरा बाळगणाऱ्या राजस्थानी तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफुच्या बोंडाचा चुरा, अफू असे ५ लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात ही कारवाई केली आहे. अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षकनगर, येवलेवाडी, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे शहरात घरफोडीचे सत्र कायम; १८ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक येवलेवाडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी काला याच्याकडे अफुच्या बाेंडाचा चुरा (पाॅपी स्ट्राॅ), अफू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून काला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. पिशवीत एक किलो ७२८ ग्रॅम अफुच्या बोंडाचा चुरा, तसेच ५८ मिलिग्रॅम अफू सापडली. कालाने अमली पदार्थ कोठून आणले, तसेच कोणाला विकणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, स्वप्नील मिसाळ यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×