एसपी नवनीत कॅावत यांच्या कारवाईने सट्टेबाजांचे साम्राज्य उध्वस्त

एसपी नवनीत कॅावत यांच्या कारवाईने सट्टेबाजांचे साम्राज्य उध्वस्त

कारेगव्हाणमध्ये महादेव अँप लोटस सट्ट्याचा केला पर्दाफाश

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठोस उपाययोजना राबवल्या आहेत. प्रामुख्याने सट्टेबाजांविरुद्ध सातत्याने कारवाई केल्यामुळे अनेकांच्या आर्थिक नाड्या थंड झाल्या आहेत. जिल्ह्यातील गावांमध्ये शेतात सट्टाचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळावर जाऊन महादेव अँप लोटस सट्ट्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. यामध्ये तब्बल २०० बँक खात्यातून कोट्यावधीची उलाढाल होत असल्याचा संशय आहे.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची १४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

जुगार प्रतिबंध अधिनियमानुसार श्रीराम मच्छिंद्र कंधारे, अजय श्रीराम खिल्लारे, सचिन रामनाथ ढाकणे, किरण श्रीरंग खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये दोन लॅपटॉप, ११ मोबाईलसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचाही तपास पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. आता त्यामुळे मुख्य सुत्रधारासह अनेक बडे मासे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगव्हाणमध्ये बीड पोलीस मुख्यालयातील दोन कॉन्स्टेबलने दि.२० रात्री एक वाजता छापा टाकला. ऑनलाइन बेटिंग करणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेतले. ११ हून अधिक मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत . गेल्या अनेक महिन्यांपासून कारेगव्हाण परिसरात हे अवैध सट्टा सुरू होता अशी माहिती कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे. करोडो रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे या जप्त केलेल्या मोबाईल मधून उघड झाले आहे. आरोपींचे परदेशात कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही कारवाई विनायक जोगदंड, अनिकेत या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×