Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळा

शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळा

शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त सी.पी राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र यांच्या हस्ते विशेष सत्कार

marathinews24.com

पुणे – शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त सी.पी राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला व ‘ज्ञानपर्व’ या विशेषांकाचे प्रकाशनन करण्यात आले. हा कार्यक्रम सिंबोयसिस विश्वभवन हॉल, सेनापती बापट रोड, छत्रपती शिवाजीनगर येथे घेण्यात आला. यावेळी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, शाहू खासदार छत्रपती महाराज,व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह अभिजीत पवार प्रशांत नारनवरे, अंकित काणे; संजीवनी मुजुमदार; डॉ. स्वाती. एस. मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न; मधमाशांचे संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज-उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी – सविस्तर बातमी 

सम्राट फडणीस म्हणाले,” डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा प्रवास एक पर्वच म्हणावा लागेल, एक व्यक्ती आणि संस्थेची एकरूपता हि डॉ. मुजुमदार सरांमध्ये अनोखी आहे, “वसुधैव कुटुंबकम” हि संकल्पना त्यांनी जगत खुपच उत्तम रित्या प्रत्यक्षात आणली. डॉ. मुजुमदार सर हे कितीही प्रसिद्धी झोतात गेले तरी त्यांना नेहमी एक सामान्य माणूस म्हणून प्रभाव पाडणे हे नेहमीच पसंत होते. आणि त्याच्या कॉलेजच्या प्रांगणातील कॉमन मॅनचा पुतळा हीच संकल्पना स्पष्ट करतो. अशा सध्या पण ध्येय गाठून त्याच्या विस्तार करणाऱ्या व शौक्षाणिक उतकृष्टेचा ध्यास घेतलेल्या डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचे मी अभिनन्दन करतो.

अभिजीत पवार म्हणाले, ” दादा हे आजच्या काळातील माउलीच आहेत, कारण एका विद्यार्थ्याची वेदना बघून “वसुधैव कुटुंबकम” हि भावना त्यांच्या मनात आली. हि एक मनाची अवस्था आहे हि भावना सगळ्यानं येऊ शकत नाही. दादांमध्ये काय आहे कि एवढी मोठी युनिव्हर्सिटी त्यांनी उभी केली. संतुलित जीवन कसं जगायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. पंचेंद्रियांच्या पलीकडील अनुभूती त्यांच्या कडून मिळते. दादांचा प्रवास ज्ञानी ते ज्ञानयोगी अशा आहे. आज समाजा मध्ये ज्ञानाच विद्यापीठ हे एक ज्ञानाच मंदिर होणं गरजेचं आहे तरच ते कैक दशके टिकेल. अध्यात्म आणि भक्ती एकत्र आणून आपण यशश्वी आयुष्य जगू शकतो याचा दादा एक उत्तम उद्धरण आहेत”.

शाहू छत्रपती महाराज म्हणाले ,” सिंबोयसिस हे खरोखर युनिव्हर्सल आहे. यामध्ये बहुजन समाजाला हि स्थान आहे. याचा मूळ गाभा मानवी समाज व्यवस्थितरीत्या स्थापनेचा आहे. डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा वाढदिवस हा विश्वाचा आनंद सोहळा आहे. डॉ. शां. ब. मुजुमदारहे एक विचारांचं विद्यापीठ आहे, आणि या विद्यपीठामध्ये ज्ञानदानाची ताकद आहे.”

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले,” एवढ्या मोठया संख्येने उपास्थींनांना पाहून आनंद होत आहे. “मी कोण?” हा प्रश्न जसा मला पडला तास सगळ्यांनाच पडला पाहिजे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्याक्तींना तर पडलाच पाहिजे .परदेशी विद्यार्थ्यच्या अश्रूंने मला, मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि सिंबोयसिसची निव रोवली गेली आणि इथून माझ्या आयुष्याला कलाटनी मिळाली. आज ८५ देशांचे विद्यार्थी सिंबोयसिस मध्ये शिक्षण घेतात, हजारो परदेशी विद्यर्थी आणि भारतीय विद्यर्थी एकत्र शिक्षण घेतात त्या वेळी खरा “वसुधैव कुटुंबकम” चा प्रत्यय येतो आणि हा प्रवास असाच चालू राहावा हीच इच्छा.”

सी.पी राधाकृष्णन म्हणाले ,” डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी नव्वदी पार केली आणि ते नक्की १०० वर्ष पार करतील. या प्रवासात संजीवनी मुजुमदार यांनीं सरांना चांगली साथ दिली. संस्था हि फक्त नफा कमवण्यासाठी बंधू नये एक ध्येय ठरवून ते गाठावा या मध्ये स्वयं शिस्त महत्वाची. डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा वटवृक्ष असाच विस्थराव या शुभेच्छा देतो.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×