Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

marathinews24.com

मुंबई – कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव – सविस्तर बातमी 

ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे.

ज्येष्ठ पुरस्कार –

नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025)

युवा पुरस्कार –

नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025).

सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×