Breking News
नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटकसंजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्तयुट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटकपुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारपुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चाखरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई कराशिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची नियुक्तीकिल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

राज्य उत्पादन शुल्क पथकाची पुरंदर तालुक्यात छापेमारी

भोसलेवाडी व जेजुरी गावांच्या हद्दीत गावठी दारु भट्टीवर कारवाई

marathinews24.com

पुणे – राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे नरेंद्र थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने 22 जुलैला पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गाव हद्दीत टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस, मोकळया जागेसह जेजुरी गावच्या हद्दीत बारामती जेजुरी रोड लगत, ओढ्याच्या काठी दोन विकाणी सुरु असलेल्या अवैध गावठी दारुच्या भट्टीवर छापे टाकले.

मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्यावतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन – सविस्तर बातमी

छाप्यामध्ये 5 हजार 550 लिटर रसायन, 1 हजार 855 लिटर अवैध गावठी हातभटटी दारु व निर्मीती साहीत्य असा एकुण अंदाजे रु. 3 लाख 94 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याठिकाणी गावठी दारूभट्टी तयार करणा-या इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ब. क. ई. फ नुसार गुन्हे नोंदविले आहेत. यापुढे देखील अवैध गावठी हातभटटी दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने सातत्याने छापे मारण्याची कारवाई सुरु राहणार असल्याचे निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

ही कारवाई विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते, जवान शशीकांत भाट, संदिप सुर्वे व ऋतिक कोळपे यांनी केली असून, या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते करीत आहेत. पुणे शहरातील नागरीकांना अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती असल्यास त्यांनी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधवा असे, आवाहन निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×