Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बाप्पाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

बाप्पाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साकारल्या गणेशमूर्ती

पुणे – बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, ४७ मुलींची शाळा येथे (दि. २३) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत २०० विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या.

देशाचा अभिमान ठरलेल्या “चिनाब ब्रिज”ची जन्मकथा – सविस्तर बातमी 

राज्य सरकारने गणेशोत्सव हा राज्याच्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केल्यानंतर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची आयोजित केलेली ही पहिलीच कार्यशाळा ठरली आहे.

ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिॲलिटीचे प्रतिनिधी प्रसाद पाटील, महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे क्रीडा अधिकारी माणिक देवकर, अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जायभाये, सुप्रसिद्‌ध शिल्पकार विवेक खटावकर मंचावर होते. कार्यशाळेचे संयोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर, निकिता मोघे आणि केतकी महाजन यांनी केले. वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत आणि सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर यांच्या सहकार्याने कार्यशळा आयोजित करण्यात आली होती.

शिल्पकार विजय राऊत, विजय दीक्षित यांनी सुरुवातीस विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी साकारावी याविषयी मार्गदर्शन केले.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. किरण देवकर, प्रसाद पाटील, मुरली लाहोटी, विवेक खटावकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राहुल सुतार यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका ज्योती मानकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×