सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू
marathinews24.com
पुणे – Temple Donation Box Theft : शहरातील घोरपडे पेठेतील घोरपडे उद्यानाच्या आवारात असलेल्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध खडक पोलिसंनी गुन्हा दाखल केला. याबाबत अरुण बजरंग जाधव (वय ३५, रा. कैकाड आळी, घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
एसटी प्रवासी महिलेचे ४ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील पुणे महापालिकेचे श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान आहे. उद्यानाच्या आवारात श्री शिव मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या आवारातील दानपेटीचे कुलूप तोडले. Temple Donation Box Theft दानपेटीतील साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी उद्यानाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार हेमंत पेरणे तपास करत आहेत.




















